एकटं वाटतंय फार कोणी नाही जवळ जवळ घेणारं इथे कोणीच का नाही .. मी ज्याला त्याला जवळ घेतलं भींतीला खुर्चीला टेबलावर पलंगावर सगळ्यांना कुरवाळलं या डोक्यावरून कोण कुरवाळेल हात .. मी तरसलो .. त्याचा हात डोक्यावरून चेहर्यावरून फिरेल म्हणून ताटकळत बसलो ..
Posts
Showing posts from December, 2020
पत्र Swapnil 22/12/2020
- Get link
- X
- Other Apps
I have inner feeling that I m getting blamed by our relatives. which may not be wrong because I m not following the traditional routein I wish to live independently now after marriage . And I m not doing so many things which usually newly married women do . (असा नातेवाइक विचार करतात तू नाही करत पण हीला हे हवय हे नव्यानेच उमगल्यासारखं सांगण्यात येतं. ) I just want to live authentically . I want to be in the environment where I can be my self. I get shrink when there is no such environment where I can share my life purposes without getting judged.पण मला असं वाटतं की मला जज केलं जातय की ही “अशी” अशी आहे. मला परवा लग्नात अनेक नातेवाइक बोलले तु मिळून मिसळून रहात नाही... जिथे मला अभ्यास करायचा परिक्षा द्यायची असं म्हणल्यावर “बापरे ही तर आशी निघाली ही कायपरिक्षा परिक्षा लावते घरी व्हा” ही पुस्तंक घेउन बसेल तर घर कोण पाहिल ?हीतर हिंडफिरी आहे स्वार्थी आहे असं केलं गेलं तिथं मला मिसळणं जमलं नाही . आपलं काही कुरबूरी सुरू असताना मला आई राण...
निराश वाटत असेल तर हरखत नाही
- Get link
- X
- Other Apps
आपण कीतीही मानलं की सकारात्मक विचारांचा चांगला परिणाम होतो. सतत हसत मुख रहावे. सतत आनंदी रहावे तरीही हे असं छान चेहरा करून कायम राहणे शक्य नाही. काही अपवादात्कांमक लोकांसाठी हे शक्य असेलही . पण सर्वांसाठी नाही.आपल्या वैयक्तिक आयुश्यात घडत असणार्या अनेक घटना घडामोडी आपल्याला निराश करत असतात काही वेळा सुन्न करत असतात. तेव्हा बी पाॅझीटीव्ह वगैरे मुदादाम आणू नये. त्या घटना ,घडामोडी कुणाच बोलणं या गोष्टीचां जो नैसर्गीक परिणाम होतो तो म्हणजे निराश वाटणे , रडायला येणे , कुणाशीही बोलावं न वाटणे, काहीच करावं न वाटणे , इ. होउ द्यायला पाहिजे . It is okay not to be okay all the time. असं केल्यानेच आपण या त्रासातून बाहेर पडू शकतो. आपण शांत असण्याने कींवा आपल्या जवळचे आजूबाजूचे लोक यांना काय वाटेल म्हणून आपण मुद्दाम आनंदी राहण्याचा छान छान हसुन बोलण्याचा प्रयत्न करतो. येणार्या भावना दाबून टाकतो या दबलेल्या भावना पुढे रौद्र रूप धारण करतात त्यापेक्षा आज निराश वाटत असेल तर वाटू द्या त्या निराशेचा स्विकार करुन पाहिला तर आपल्याला जास्त मुक्त वाटू शकेल.
- Get link
- X
- Other Apps
समता स्वातंत्र्य न्याय आणी सहजता या मूल्यांना धरून आपण जीवन जगायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे . त्यासाठी माझा कायम प्रयत्न असेल. असं आपल्या जवळच्या सगळ्यांना आपण जगू द्यावं व आपणही जगावं असं मला वाटतं. असं स्पिरीट मधे आलं तर वादाचे मुद्दे उरणार नाही असंही मला वाटतं. मुळात जगात होणारच सगळे वाद हे या तत्वाला धरून दोन्ही बाजू चालत नाही यामुळेच होतात असंही मला वाटतं. माझ्या आठवणी प्रमाणे याला धरून चालायचा मी प्रयत्न केलाय . किमान समानता आणी न्याय या तत्वाना कधी मोडलेलं नाही. स्वातंत्र्य तर दिलच होतं फक्त ते डोळ्यासमोर नको होतं. पण मीच पूर्णपणे बरोबर असं मला म्हणायचं नाही. I m sorry I love you Please forgive me Thankyou