पत्र Swapnil 22/12/2020

 I have inner feeling that I m getting blamed by our relatives.  which may not be  wrong because  I m not following the traditional routein I wish to live independently now after marriage . And I m not doing so many things which usually newly married women do . (असा नातेवाइक  विचार करतात तू नाही करत पण हीला हे हवय हे नव्यानेच उमगल्यासारखं सांगण्यात येतं. ) I just want to live authentically . I want to be in the environment where I can be my self. I get shrink when there is no such environment where I can share my life purposes without getting judged.पण मला असं वाटतं की मला  जज केलं जातय की ही “अशी” अशी आहे. मला परवा लग्नात अनेक नातेवाइक बोलले तु मिळून मिसळून रहात नाही... जिथे मला अभ्यास करायचा परिक्षा द्यायची असं म्हणल्यावर “बापरे ही तर आशी निघाली ही कायपरिक्षा परिक्षा लावते घरी व्हा” ही पुस्तंक घेउन बसेल तर घर कोण पाहिल ?हीतर हिंडफिरी आहे  स्वार्थी आहे असं  केलं गेलं  तिथं मला मिसळणं जमलं नाही .  आपलं काही कुरबूरी सुरू असताना मला आई राणी शी नीट  कसं बोलता येइल हे तू परवा म्हणाला पण इतर नातेवाईकांना तर फक्त इतकच वाटतं ही चढेल आहे. चार पाहूण्यात असं वाटतं की हे लोक माझ्याबद्दल काही ग्रह ठेवून असतील का.. आताही मला ‘तू नको तर पोस्ट हवी ,पैसे हवे  चौकट नकोय यासाठी वेगळं रहायचं होतं ‘हेच अधोरेखित केलं जातय .मुद्दा तो नव्हता to be honest  and the last sentence you should always remember is that...  “I WAS NOT ABLE TO BE MYSELF in that environment” चौकटीत तर तुलाही जमत नाही शोन्या मग मलाच ती नकोय हे बोललं गेलं याने मी निराश होतो 
तर तुलाही  माहित आहे मी रडकी नाही नव्हतो. मी हसरी आणी खेळकर होतो माझ्या अस्तित्वात एक प्रकारची ताजगी होती मी जिंदादिल होतो बेधडक होतो  आणी तुझ्यासोबत असताना ही होतो बहूतेकवेळा तुला आठवत असेल . आणी आता हे काय झालंय . हेच तुझ्या बाबतीतही आहे की तु बिनधास्त बोलायचा कलंदरीत जगायचा  . तू  माझा  चांगला मित्र आहेस तू हे जाणतो तूला नाही का वाटत ही कुठे आहे मुक्ता .जी गमती जमती करत रहायची .. हसणं कंट्रोल न होणारी   .. जर ती नसेल तर ती त्या ताजगीसाठी झटते  आहे.  देवाशपथ ... “I WAS NOT ABLE TO BE MYSELF”  हेच लक्षात ठेव प्लीज मी मिसळत नाही मी हे करत नाही ते करत नाही फ्रीडम पायजेल याला काय अर्थ नाही.. याचं कारण मी मी म्हणून जगत नाही  हे आहे . हे ककुणाला कळणार नाही. लोक मला बोल लावतील असं वाटतय ( तु असं का केलं माहित नाही पण तू मागे लावले आहेतअसे बोल जिच्यावर जीव आहे , जी निष्ठेने तुझ्या सोबत होती आता लावशील असं नाही वाटत पण तु कधी लावून टाकशील असंही वाटतय  ). तु या नाव ठेवण्यातूनही बाहेर येशील कारण तुझ्यात त्या  खरं असण्याच्या शक्यता  आहेत हे  मी जाणतो  . तु  एकेकाळी माझ्याशी खुप बोलायचा आपण खुप बोलायचो जगण्यावर आॅथेंटीसीटीवर ..आपण मजेत असायचो .   आपला तो झोन संपला याची खंत आयुश्यभर असेल.  Now This is worst version of  two of us. 
वाटतं जाउ दे तुला आत कुठे तरी जे माहित आहे ते आहे आणी मला ही .की मी होउन पुढं पुढं कमी करत असेन  पण मी आयुश्यात तुला कशासाठी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली फोर्स केला नाही.. मी मानसिक त्रास होइल असं वागलो नाही असंही मला वाटतय .तुझ्यातला तु बहरावा म्हणून मनापासून काही करून पाहिलं .ते काही फार आहे असंही मला म्हणायचं नाही पण हे तू विसरतोय असं जेव्हा वाटतं तेव्हा खुप वाइट वाटतं रे पिल्या...तु सगळ्या समोर म्हणतो मला हिच्याकडून सुख नाही .  
तु हे विसरलाय का की आपल्या दोघांना आपल्या व्यक्तीमत्वाला बहरता येइल असं वाटल्याने आपण सोबत होतो सोबत असण्याचा निर्णय घेतला.  हे कुणा नातेवाईकांना काय कुणालाच समजू शकेल का .. जर हेच आपल्याला बोलता येत नसेल तर आपण दोघेही वर वर च्या  तक्करारी करतोय का ..   यातून तूला किंवा मला काहीच (art ) निर्माण करता येणार नाहीयाय हे तुला कळतय का माय . खुप साधं आहे आपण काॅंम्पलीकेटेड करतोय एका वाक्यात संपू शकतं हे की आपल्याला सहज जगायचं आहे जगू द्यायचं आहे .  हे मान्य करत नाही आणी जगत नाही तोवर आपण एकमेकांना जीव लावूच शकत नाही किंवा मस्त जगू शकत नाही असं म्हणू . आपल्याला वाटतय पण आपण जीव लावतच नाही आहोत एकमेकांना आपण का फेक जगतोय . हे कळून घेत नाही तोपर्यंत पिसासारखं हलकं वाटणार नाही. हे हलकं वाटण्याचे अनुभव आपण घेतले आहेत तेव्हा आपण मुक्त होतो आणी सोबतही.
तुझ्या बाबतीत अजून एक खरय की तुला स्थैर्य हवय कुटूंब सांभाळण्यासाठी कोणीतरी हवय जे गैर नाही तुझ्यासाठी आयुश्य दोन्ही आहे पक्की चौकट धरून ठेवनारी बायको   आणी  चौकटीबाहेर असणारी मजा .. मला माफ कर यातलं दोन्ही मला शक्य नाही. मला कधी खरोखर की वाटतं याने अरेंज मॅरेज करून फार काही अॅस्पेरेशन नसणारी सुगरण  आणी जीला फक्त संसार करण्यात रस आहे अशी बायको पाहायला पाहिजे होती .  थोडा विचार केला तर मला वाटतं की तुला खरं आतून समाधान तेव्हा वाटणार आहे जेव्हा  मी खुप खुश आहे . आणी मलाही तु आनंदी आहेस तू तू आहेस यानेच समाधान वाटेल. Happiness on our face  is the greatest gift we can give each other.  बाकी झूटय.  -

Comments

Popular posts from this blog

बर्ताव

नही बोलना

धोकेबाजांना सबक कसा शिकवू?