निराश वाटत असेल तर हरखत नाही

 आपण कीतीही मानलं  की सकारात्मक विचारांचा चांगला परिणाम होतो. सतत हसत मुख रहावे. सतत आनंदी रहावे तरीही हे असं छान चेहरा करून कायम राहणे शक्य नाही. काही अपवादात्कांमक लोकांसाठी हे शक्य असेलही . पण सर्वांसाठी नाही.आपल्या वैयक्तिक आयुश्यात  घडत असणार्या अनेक घटना घडामोडी आपल्याला निराश करत असतात काही वेळा सुन्न करत असतात. तेव्हा बी पाॅझीटीव्ह वगैरे मुदादाम आणू नये. त्या घटना ,घडामोडी कुणाच बोलणं या गोष्टीचां जो नैसर्गीक परिणाम होतो तो म्हणजे निराश वाटणे , रडायला येणे , कुणाशीही बोलावं न वाटणे, काहीच करावं न वाटणे , इ. होउ द्यायला पाहिजे . It is okay not to be okay  all the time.  असं केल्यानेच आपण या त्रासातून बाहेर पडू शकतो. आपण शांत असण्याने  कींवा आपल्या जवळचे आजूबाजूचे लोक यांना काय वाटेल म्हणून आपण मुद्दाम आनंदी राहण्याचा छान छान हसुन बोलण्याचा प्रयत्न करतो. येणार्या भावना दाबून टाकतो  या दबलेल्या भावना पुढे रौद्र रूप धारण करतात त्यापेक्षा आज निराश वाटत असेल तर वाटू द्या त्या निराशेचा स्विकार करुन पाहिला तर आपल्याला जास्त मुक्त वाटू शकेल. 

Comments

Popular posts from this blog

धोका

What do you learn from textile design course?

आदमी औरत से क्या चाहता है