Posts

Showing posts from October, 2020

पुरूषसत्ता

 दोघेही एकाच वेळी ओफीस ला गेले सोबतच दुपारी जेवले आणी संध्याकाळी एकाच वेळी सोबतपरत आले. आज खुप थकवा जाणवत असल्याने ती येउन फ्रेश होउन झोपायला गेली . तो फ्रेश होउन युट्यूब पाहत बसला. थोडा वेळाने ... तो- अगं झोपली पण ? तू मला जेवायच सुध्दा नाही  विचारलं..  ती-हो दमलो होतो.मला वाटलं.. तू करशील काही  तो- आठ वाजत आले रात्रीचे तरी मला जेवायच विचारावं नाही वाटलं तूला? ती- तू तरी कुठं विचारलं माला  तो-म्हणजे?   मी कसकाय विचारणार ? ती - कसकाय म्हणजे? तो - म्हणजे मी तूला हे विचारायला पाहिजे होतं का की तुझ्यासाठी काय स्कवयंपाक करू असं? ती - नाही  नाही .. निदान जेवायचं नाही का तूला .. न जेवता का झोपतेय असं तरी  तो - अगं दुपारी दाबून जेवली आहेस तू ..  ती -आपण सोबतच जेवलोय. बर ते सोड मी थकलो होतो म्हणून झोपलो जाउदे काय करू तूला जेवायला?  तो- काही नको बाइ आता जाउदे मला भूक नाही ती- आत्ताच जेवायचा विषय काढला आपण आता का नाही जेवायचं? सांग काय खाणार   तो-  काय बनवू शकते तू?  ती -मनातल्या मनात  (.. साला थकलो म्हणल्यावर पण कळत नाही याला ...
 करमत नाही. काहीही करावं वाटत नाही . थकलो. झोपायचय. सुरक्षाकवच असल्यासारखं कुशीत घ्यावं कुणीतरी .गोंजारत प्रेमाने झोपू घालावं उद्या विचारू नये रात्री बरं वाटलं ना मी करतो आसं प्रेम करतो .आता रात्री छान झोपलीस ना मग आता हे हे कर अशी कामांची लिस्ट देउ नये हातात निदान कारण देउन तरी . मग दिवसभर काही घरकामात स्वयंपाकात कसूर राहिला की म्हणू नये हे करायला काय होतं तुला मी रात्री किती छान झोपू  घातलं, मग घर आवरायला काय झालं असं म्हनू नये. कशालाच कशाचं कारण कोणी देउ नये. या या मी हे हे करतो म्हणून तू हे हे कर असं सांगत राहू नये. आराम दिलाय तर दे अन काढू नको . निदान ते तसं मी करत जाईन पण तू दोन वेळ जेवण बनव गरम गरम असं काहीच सांगू नये. थकतो माणूस. परत मागावं वाटत नाही काही. देत असेल तर घ्यावं वाटत नाही. आता खरच वाटतय थोपटून झोपी घालावं छान . असं बायकांना नवरे करत नसतील तर नवर्यांनी त्यांना कुठलाही वाद न घालता वावगा प्रश्न न विचारता जाउ द्यायला पाहिजे थोपटून झोपी घालणार्या माणसाकडे. समाजानेही याविरोधात बाइला नावं ठेउ नये. नवरा जाउ का म्हणलं तर थेट नाही म्हणनार नाही पण म्हणेल आता हे काम प...

अॅब्यूज-१

 नवर्याने बायकोला  तु माझ्या घरच्यांविषयी चांगली भावना ठेव इतकं सांगण ठिक आहे पण तु त्यांच्यात इनव्हाॅल्वह हो,त्यांच्याशी प्रेमाने वाग, त्यांच्याशी गप्पा मार असं सांगणे आणी फक्त सांगणच नाही तर तू तसच करायला हवं असं आपल्याला वााटतं हे सांगणे आणी तुझ्याकडून हे झालं नाही ,तू आपल्याच धूंदीत राहिलीस तर  मात्र मी तुझ्यावर रागवू शकतो. तो माझा राग स्वाभाविक आहे. तो उगाच नाही हे ही दाखवणं म्हणजे एक प्रकारच अॅब्यूज आहे. तुम्ही लग्न करता पण म्हणून तुमच्या बायकोवर तुम्ही कोणतीही गोष्ट लादू शकत नाही. लादू नये. बायको ने ही हे असं तिच्या घरच्यांच्या बाबतीत लादू नये. त्यांच्या त्यांच्या घरच्यांशी सहज प्रेमाने बोलता येत असेल तरच ते होउ द्यावं नसेल होत तर त्यामागे काही कारणं असतील . पालकांनीही आपली सेवा-सुश्रूशा-सांभाळ  या गोष्टींसाठी केवळ आपल्या मुलावर आणी मुलीवर अवलंबून रहावे . आपली सुन वा जावाइ हे लोक ते करत असतील तर चांगलच परंतु नसतील करत (त्यातही सून )तर तीला बेजबाबदार वा स्वार्थी असा शिक्का लावू नये. 

न मागता पुरुषांना पुरवत राहणार्या बायका

 भारतात मुली किंवा महिलांना आपल्या इच्छा बोलून न दाखवण्याची आणी शक्य झालच तर कुठलीही खास मागणी न करण्याची , मागणी न करता देत राहण्याची शिकवण कळत न कळत कुटूंब आणी समाजाकडून मिळत जाते. पुढे नात्यात अस्तानाही न मागता देत राहण्यातच समाधान मानावं असं मुलीला वाटतं. त्यात तिला सुरूवातीला आनंद वाटतो. हे असं नातं टिकवण्यात पुरूषाला फायदा असतो.  परंतु बाहेरून लादली गेली असल्याने या  भिनलेल्या शिकवणीचा जाच तिला पुढे होत राहतो. आतल्या आत दात ओठ खाण सुरू राहतं . कर्म करत रहा फळाची अपेक्षा ठेउ नको ही धर्मातली शिकवण फालतू वाटायला लागते. चिडचिड वाढते. खटके उडतात . आपल्या इच्छा बोलून दाखवण्याची शिकवण फारशी नसल्याने काय हवय हे शब्दात थेट सांगता येत नाही .किंवा मी हे हे मागत नाही अशी ईमेज वर्षानुवर्षे जपल्याने ती स्पष्टपणे ती इच्छा सांगूही शकत नाही. आणी चिडचिड थांबवूही शकत नाही. हे न दिसणारं दुष्टचक्र आहे ज्याच्यासोबत बाई आयुष्य घलवते.. आणी म्हातारपणी किरकिरी होते.