न मागता पुरुषांना पुरवत राहणार्या बायका

 भारतात मुली किंवा महिलांना आपल्या इच्छा बोलून न दाखवण्याची आणी शक्य झालच तर कुठलीही खास मागणी न करण्याची , मागणी न करता देत राहण्याची शिकवण कळत न कळत कुटूंब आणी समाजाकडून मिळत जाते. पुढे नात्यात अस्तानाही न मागता देत राहण्यातच समाधान मानावं असं मुलीला वाटतं. त्यात तिला सुरूवातीला आनंद वाटतो. हे असं नातं टिकवण्यात पुरूषाला फायदा असतो. 

परंतु बाहेरून लादली गेली असल्याने या  भिनलेल्या शिकवणीचा जाच तिला पुढे होत राहतो. आतल्या आत दात ओठ खाण सुरू राहतं . कर्म करत रहा फळाची अपेक्षा ठेउ नको ही धर्मातली शिकवण फालतू वाटायला लागते. चिडचिड वाढते. खटके उडतात . आपल्या इच्छा बोलून दाखवण्याची शिकवण फारशी नसल्याने काय हवय हे शब्दात थेट सांगता येत नाही .किंवा मी हे हे मागत नाही अशी ईमेज वर्षानुवर्षे जपल्याने ती स्पष्टपणे ती इच्छा सांगूही शकत नाही. आणी चिडचिड थांबवूही शकत नाही. हे न दिसणारं दुष्टचक्र आहे ज्याच्यासोबत बाई आयुष्य घलवते.. आणी म्हातारपणी किरकिरी होते.

Comments

Popular posts from this blog

धोका

What do you learn from textile design course?

आदमी औरत से क्या चाहता है