करमत नाही. काहीही करावं वाटत नाही . थकलो. झोपायचय. सुरक्षाकवच असल्यासारखं कुशीत घ्यावं कुणीतरी .गोंजारत प्रेमाने झोपू घालावं उद्या विचारू नये रात्री बरं वाटलं ना मी करतो आसं प्रेम करतो .आता रात्री छान झोपलीस ना मग आता हे हे कर अशी कामांची लिस्ट देउ नये हातात निदान कारण देउन तरी . मग दिवसभर काही घरकामात स्वयंपाकात कसूर राहिला की म्हणू नये हे करायला काय होतं तुला मी रात्री किती छान झोपू  घातलं, मग घर आवरायला काय झालं असं म्हनू नये. कशालाच कशाचं कारण कोणी देउ नये. या या मी हे हे करतो म्हणून तू हे हे कर असं सांगत राहू नये. आराम दिलाय तर दे अन काढू नको . निदान ते तसं मी करत जाईन पण तू दोन वेळ जेवण बनव गरम गरम असं काहीच सांगू नये. थकतो माणूस. परत मागावं वाटत नाही काही. देत असेल तर घ्यावं वाटत नाही. आता खरच वाटतय थोपटून झोपी घालावं छान . असं बायकांना नवरे करत नसतील तर नवर्यांनी त्यांना कुठलाही वाद न घालता वावगा प्रश्न न विचारता जाउ द्यायला पाहिजे थोपटून झोपी घालणार्या माणसाकडे. समाजानेही याविरोधात बाइला नावं ठेउ नये. नवरा जाउ का म्हणलं तर थेट नाही म्हणनार नाही पण म्हणेल आता हे काम पडलय ते कधी करणार ,मी आहे ना ,आता काय तू स्ट्रेस मधे आहेस का.. असं काहीतरी म्हणेल . म्हणजे रिझल्ट नाही हाच असेल

Comments

Popular posts from this blog

धोका

What do you learn from textile design course?

आदमी औरत से क्या चाहता है