पुरूषसत्ता
दोघेही एकाच वेळी ओफीस ला गेले सोबतच दुपारी जेवले आणी संध्याकाळी एकाच वेळी सोबतपरत आले. आज खुप थकवा जाणवत असल्याने ती येउन फ्रेश होउन झोपायला गेली . तो फ्रेश होउन युट्यूब पाहत बसला. थोडा वेळाने ...
तो- अगं झोपली पण ? तू मला जेवायच सुध्दा नाही विचारलं..
ती-हो दमलो होतो.मला वाटलं.. तू करशील काही
तो- आठ वाजत आले रात्रीचे तरी मला जेवायच विचारावं नाही वाटलं तूला?
ती- तू तरी कुठं विचारलं माला
तो-म्हणजे? मी कसकाय विचारणार ?
ती - कसकाय म्हणजे?
तो - म्हणजे मी तूला हे विचारायला पाहिजे होतं का की तुझ्यासाठी काय स्कवयंपाक करू असं?
ती - नाही नाही .. निदान जेवायचं नाही का तूला .. न जेवता का झोपतेय असं तरी
तो - अगं दुपारी दाबून जेवली आहेस तू ..
ती -आपण सोबतच जेवलोय. बर ते सोड मी थकलो होतो म्हणून झोपलो जाउदे काय करू तूला जेवायला?
तो- काही नको बाइ आता जाउदे मला भूक नाही
ती- आत्ताच जेवायचा विषय काढला आपण आता का नाही जेवायचं? सांग काय खाणार
तो- काय बनवू शकते तू?
ती -मनातल्या मनात (.. साला थकलो म्हणल्यावर पण कळत नाही याला ) भाताला फोडणी देउ का सकाळच्या ?
तो- दे. दुसरं काही नाही का बनवू शकणार?
#नसंपणारंदडपण
Comments
Post a Comment