भारत स्वतंत्र झाला.आपण कधी होणार? आपल्या आयुष्यात कधी येणार स्वातंत्र्य .आपण कधी देणार मित्रमैत्रीणपार्टनरलेकरं यांना स्वातंत्र्य? 

जगात अस्तीत्वात असणार्या सगळ्या नात्यांमधे समता असली पाहिजे.असमान नातं फक्त आईवडिल आणी अठरा वर्षापेक्षा कमी वयाची मूलं यांच्यातच असू शकतं.

कोणत्याही  नातेसंबधाबाबत सर्वात मूलभूत आणी अत्यावश्यक घटक म्हणजे समोरच्याचा विनाअट स्विकार करणं त्यांना पूर्ण स्वातंत्र्य घेउ देणं. 

स्वीकार म्हणजे काय तर तुम्ही त्यांच्या सर्व सवयी ,लकबी , विचार स्वीकार करता . तुम्ही भविष्यात त्यांच्यात होणारे बदल- मग ते तुम्हाला आवडतील असे कींवा आवडणार नाही असे असू शकतात, यांचा स्वीकार करता त्यांच्या सोबत असता आणी प्रेम करता . हे काहीच्या काही आहे असं वाटत असेल पण तुम्ही सुध्दा त्यांच्याकडून हेच तर अपेक्षा करत असता . 

हे असं करणं हीच सगळ्यांना तारणारी बाब आहे.

मग आपण काहीतरी बंधन घालायला काय हरखत आहे? पण हिच बंधन ,अपेक्षा जेव्हा इतरांकडून तुमच्यावर लादल्या जातात तेव्हा काय होतं  हे आपल्याला माहित आहे. 

“कमीत कमी स्वताच्या भविष्याचा तरी विचार करायचास”

“कमीत कमी घर तरी नीट ठेवत जा”

“मी कायम सांगत आलो तु फक्त रोज दहा मिनीटं ध्यान करत जा”

“कमीत कमी खोटं तरी बोलू नको”

“निदान माझं एवढं तरी काम करत जा”

“कमीत कमी ह्या वस्तू वापरत जाउ नको”

“तू या या व्यक्तीला कधीच बोलायच नाही”

निदान हे कर निदान ते कर या भाषेत बोलतो तेव्हा आपण समोरच्याला हेच सांगत असतो की हे हे करत नसशील तर तू माझ्याबरोबर राहण डिझर्व्ह करत नाही. जगाच्या कोपर्यातल्या मग ते आई -मूल असेल नवरा बायको असेल यांच नातं घट्ट करायचं असेल तर हे कमीत कमी ने सुरू होणारे वाक्य टाळायला पाहिजे.अर्थात  त्याच्या एखाद्या क्रुतीने त्रास होत असेल तर निखळपणे सांगता येतो की ‘त्रास होतो’ ‘ त्रास होइल’ पण तरीही मी तुझा हक्क मान्य करतो .

आपण समोरच्यांनी कमीतकमी काय करायचं ते त्यांच त्यांना ठरवू द्यायला हवं.जरी या त्याच्या ठरवण्याने ते रसातळाला जात असले तरी.आपण त्यांना स्वतंत्र्यच द्यायला हवं .

विनाअट स्वातंत्र्य  हे एक्स्ट्रीम वाटू शकतं . काही ना काही अपेक्षा (बंधन) घालायला काय हरखत आहे? तर तशाच त्यांच्या अपेक्षा आणी बंधनं तुम्हाला मान्य असेल तरच तुम्हीही ती घाला कींवा दोघे मिळून ठरवा की ‘कमीत कमी या या गोष्टी आपण एकत्र असताना पाळूया’ . ते पाळताना कोणीतरी एकच ते पाळतय अन दुसरा नाही आणी हे नेहमीच होत असेल तेव्हा आपण एक करू शकतो त्यांच्याबरोबर रहायचं की नाही हे ठरवू शकतो. त्यांच्या कडून मिळणार्या चांगल्या वाइटाचा हिशोब करू शकतो . समजा त्याचा 70%गोष्टी चांगल्या  अन 30% न आवडणार्या असेल आणी सोबत रहायचं ठरवत असाल तर या 30% न आवडणार्या गोष्टी प्रेमाने स्विकार कराव्या लागेल .नाही तर या न आवडणार्या बाबीवरून टोमणे देणं -‘ रोज झाडून घ्यायला काय होतं’ 

‘माझे मित्र आल्यावर चहा पाणी करायला काय होतं’ 

‘आता माझा येवढा पण हक्क नाही का’ 

हे असं बंद करायला पाहिजे 

 हीच कोणत्याही नात्यांची सुंदर सुरूवात असू शकते.

आपण हा विचार सोडून द्यायला पाहिजे की मी याला /हिला सुधरवेन. हि कल्पना छान असली तरी पुढे ती टॅाक्सीक होत जाते.तुम्हाला कोणी सुधरवायचा प्रयत्न करतय हा विचार करून पहा. तुम्हाला आवडणार नाही.सुधार प्रेमातून आपल्या स्विकारातूनच शक्य होउ शकतो. सतत सांगत राहण्याने आपल्याला वरवर अनउपद्रवी वाटणार्या अपेक्षा या एखाद्याला असह्य होउ शकतात. आणी सारखं सांगत राहणारे आपण फ्रस्ट्रेट होत जातो.

“तुला हजारदा सांगितलय खिडक्या बंद करत जा” ही छोटी अपेक्षा आहे पण तुम्ही सांगून थकता अन ते एकून थकतात आणी हळू हळू नातं बिघडत जातं. 

आपण एखादी कल्पना ,विचार कसा चांगला आहे याचा मनापासून विचार करत असू तर समोरच्याचाही तसाच एखादा विचार मनापासून असू शकतो. आपल्याला वाटत असेल व्हॅकेशन म्हणजे जंगलात फिरणं तर आपल्या पार्टनरला  वाटत असेल एकांतात पडून राहणं म्हणजे मौज. इथं दोघेही बरोबर आहेत फक्त एकमेकांनी ते एकमेकांवर थोपण चूक आहे. ‘तु तर काय नुसता हिंडत असतो गावभर’ हे झालं थोपवणं. या वाक्यात आपण समोरच्याच ते वागणं डिस्कार्ड करत असतो. हेच प्रेमात समजावून सांगता येतच.

त्यांच्या आयुश्यात निदान हे हे गरजेचं आहे  असं काहीच ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपण हे ठरवू शकतो की समोरच्याला त्याची मुल्ये ,आवड निवड ठरवण्याच चूका करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देणे. आता जर त्यांच्या काही गोष्टी आपल्याला अफेक्ट करत असतील तर काय करायच ? तर आपण प्रेमाने  सांगू शकतो  ‘हे मला नाही आवडणार’ पण सल्ला दे्यायचा नाही. आणी तरीही मी तुझा आदर करतो हे त्यांना कळलं पाहिजे . आदर हा भाव कायम नसेल तर नातं नक्की  बिघडतं. 

कोणीतरी एक कोणाच्यातरी वर आहे आणी तिचं नेहमी एकायचं आहे ही गोष्ट खुप ओझं तयार करते. आणी आपल्या प्रत्येकालाच ओझं नको असतं, ते फेकूनद्यायचं असतं. 

थोडक्यात,  तुमच्या नवर्याला तुमच्या नातेवाइकाकडे न येण्याचा पूर्ण हक्क असावा.तुमच्या बायकोला स्वयंपाक करून घर न सांभाळण्याचा पूर्ण हक्क असावा(ती स्वताचे खर्च स्वता करत असेल तर). तुमच्या पार्टनरला तुमच्यापेक्षा एखाद्या कामावर लक्ष देण्याचा पूर्ण हक्क असावा. तुमच्या बायकोला तुम्हाला न पटणारी विचित्र नोकरी करण्याचा पूर्ण हक्क असावा. तुमच्या मित्राला वाइट सवयीमुळे आरोग्य बिघडवण्याचा पूर्ण हक्क आहे. 

आपण काय  चांगलं आणी काय वाइट,आपली काळजी,आपला चांगला हेतू हे आपल्यापुरतेच ठेवायला पाहिजे. आपण समोरच्याच्या हक्काचा आदर करत नसू अन केवळ इच्छा थोपवत असू तर दोघांमधे नक्की ताण  तयार होत जाइल. ज्याक्षणी आपल्याला कळतं की समोरची व्यक्ती आपल्या इच्छांना रेझीस्ट करत आहे तेव्हा आपण हरलेलो असतो. 

म्हणून समाधान हवं असेल आणी नसेल हवं तरीही आपण एक मूल्य पाळू शकतो की ‘आपण आपले मित्र, मैत्रीण, मूलं किंवा नातेवाईक यांना त्यांची त्यांची मूल्ये ठरवण्याचे जपण्याचे अन चूका करण्याचे पूर्ण स्वतंत्र्य देतो’

(टीप-ज्यांना कोणाला स्वताला त्रास करून घ्यायचा त्यांना करून घेउ  द्या. पण इतर व्यक्ती, हि प्रूथ्वी ,पर्यावरण यांना त्रास देण्याचं स्वतंत्र्य कोणालाच नाही)  

Comments

Popular posts from this blog

बर्ताव

नही बोलना

धोकेबाजांना सबक कसा शिकवू?