Posts

Showing posts from August, 2021
भारत स्वतंत्र झाला.आपण कधी होणार? आपल्या आयुष्यात कधी येणार स्वातंत्र्य .आपण कधी देणार मित्रमैत्रीणपार्टनरलेकरं यांना स्वातंत्र्य?  जगात अस्तीत्वात असणार्या सगळ्या नात्यांमधे समता असली पाहिजे.असमान नातं फक्त आईवडिल आणी अठरा वर्षापेक्षा कमी वयाची मूलं यांच्यातच असू शकतं. कोणत्याही  नातेसंबधाबाबत सर्वात मूलभूत आणी अत्यावश्यक घटक म्हणजे समोरच्याचा विनाअट स्विकार करणं त्यांना पूर्ण स्वातंत्र्य घेउ देणं.  स्वीकार म्हणजे काय तर तुम्ही त्यांच्या सर्व सवयी ,लकबी , विचार स्वीकार करता . तुम्ही भविष्यात त्यांच्यात होणारे बदल- मग ते तुम्हाला आवडतील असे कींवा आवडणार नाही असे असू शकतात, यांचा स्वीकार करता त्यांच्या सोबत असता आणी प्रेम करता . हे काहीच्या काही आहे असं वाटत असेल पण तुम्ही सुध्दा त्यांच्याकडून हेच तर अपेक्षा करत असता .  हे असं करणं हीच सगळ्यांना तारणारी बाब आहे. मग आपण काहीतरी बंधन घालायला काय हरखत आहे? पण हिच बंधन ,अपेक्षा जेव्हा इतरांकडून तुमच्यावर लादल्या जातात तेव्हा काय होतं  हे आपल्याला माहित आहे.  “कमीत कमी स्वताच्या भविष्याचा तरी विचार करायचास” “कमीत...