आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्या मनातलं सगळंच समजायला पाहिजे हा हट्ट कशाला . असं सगळंच नसतं समजूशकत कुणालाही आपलं .आणी समजा समजलं असेल समोरच्याला तर असं भाषेत कुठं सगळंच त्याला /तीला सांगता येणार आहे . मनातलं सगळंच भाषेत उतरवणं कठीण आहे असं वाटत राहतं.डोक्यावरून लाडाने कुरवाळणारा हात कोणत्या भाषेत सांगितला तर नेमका कळू शकेल? एखाद्या व्यक्तीचं आजूबाजूला असणं आणी त्यामुळे आपलं मन मोहरून जाणं याला कोणत्या भाषेने काय फरक पडणार आहे? गायतोंडे काय म्हणाले हे एकून घेण्यात काय मजा ? त्यांच्या चित्रातून जे दिसलं ते त्यांनी शब्दात सांगून अनुभवता येणारच आहे का .किंवा कोलते कवीता लिहीतात आणी त्यांच्या चित्रांवरून त्यांच्या कवीतांचा अंदाज लावायला गेलो तर वाटेल काहीही काय लिहीतात हे . तर असं चांगल स्वप्न पडल्यावर स्वप्नात जे सुख वाटलं ते सांगण तर अशक्यचाय भाषेत.
तरी ही ओरहान पामुक च ‘माय नेम इज रेड’ वाचताना तो आपल्याला ज्या काळात नेतो ,ज्या दीर्ध अंधार्र्याया मध्ययुगात नेतो , ते फक्त त्या शब्शदांच्याच माध्यमातून शक्य झालं भाषेच्याच मदतीने शक्य झालं . आणी तीथं घेउन जाण हे कोणतही संगीत कींवा कोणतंही चित्र किंवा स्पर्श यांना अशक्य आहे.
Comments
Post a Comment